Type Here to Get Search Results !

माजी क्रिकेटपटू “यांचे” निधन!


मुंबई:  मुंबईचे माजी फलंदाज राहुल मंकड यांचे बुधवारी म्हणजेच काल निधन झाले आहे. ते ६६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.  त्यांच्या पश्चात पत्नी निशिता, दोन मुली असा परिवार आहे.माजी क्रिकेटपटू विनू मंकड यांच्या तीन मुलांपैकी राहुल हे सर्वात लहान होते. हे तिघेही प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले. सलामीवीर राहुल यांनी १९७२-७३ ते १९८४-८५ या कालावधीतील ४७ सामन्यांत ३५.७७च्या सरासरीने एकूण २१११ धावा केल्या आहेत.यामध्ये पाच शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश होता. रणजी विजेत्या मुंबईच्या संघात ते चार वेळा सदस्य होते. याशिवाय १९७८-७९च्या दुलीप करंडक अंतिम सामन्यातही त्यांनी मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies