पैशाची रक्कम पळवणाऱ्या दोन चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

 पुणे : पैशाची रक्कम पळवणाऱ्या दोन चोरांना पकडले शिरूर पोलिसांनी. दोन आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. कर्जाची रक्कम बँकेत भरण्यासाठी जात असलेल्या व्यक्तीच्या हातातील बॅग हिसकावणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या.शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील बाळासाहेब खेडकर यांनी यासंबंधी तक्रार दिली आहे. न्हावरे येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ते आपल्या नातेवाईकांसह 7,13,000/- रू कर्जाची रक्कम भरण्यासाठी बँकेत जात होते. न्हावरे ते चौफुला डांबरी रोडने ते जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या हातातली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान ती पिशवी जबरदस्तीने ओढली असता फाटली व त्यामुळे काही रक्कम रस्त्यावर पडली. तर आरोपींच्या हाती जवळपास 70,000 रुपये लागले. मिळालेली रक्कम घेऊन त्यांनी पोबारा  केला.याप्रकरणी बाळासाहेब खेडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे . तपासाची चक्रे फिरवत शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी सापळा रचून या आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured