Type Here to Get Search Results !

भारताच्या तुलनेत इतर देशात पेट्रोलच्या किंमत किती आहेत? जाणून घ्या सविस्तर माहिती




आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमत वाढल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत किमतींवर होऊ लागला आहे. देशात १३७ दिवस पेट्रोलचे स्थिर असलेले दर गगनाला भिडले आहेत. निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढीचा भडका उडताना दिसत आहे. गेल्या नऊ दिवसात आठव्यांदा दरवाढ झाली आहे. देशभरामध्ये आज इंधनाचे दर प्रति लिटरमागे ८० पैशांनी वाढले आहे. विशेष म्हणजे या दरवाढीमुळे आतापर्यंत १०० रुपये लिटरच्या आत असणाऱ्या डिझेलच्या दरांनी मुंबईमध्ये १०० चा टप्पा ओलांडला आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांचा खिशाला बसला आहे.


या देशात सर्वात स्वस्त पेट्रोल आहे..... 


व्हेनेझुएलामध्ये पेट्रोलची किंमत १ रुपये ९० पैसे म्हणजेच ०.०२५अमेरिकन डॉलर प्रति लिटर आहे. ही किंमत भारताच्या तुलनेत ५० पट कमी आहे.


लिबियामध्ये पेट्रोलची किंमत २ रुपये ४३ पैसे किंवा ०.३२ डॉलर प्रति लिटर आहे.


सीरियामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत २४ रुपये किंवा ०.३१६ डॉलर प्रति लिटर आहे. ते भारताच्या तुलनेत चौपट स्वस्त आहे.


तुर्कमेनिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत ३२ रुपये ५१ पैसे म्हणजेच ०.४२८ डॉलर प्रति लिटर आहे.


नायजेरियामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत ३० रुपये ३८ पैसे म्हणजेच ०.४०० डॉलर प्रति लिटर आहे.


कुवेतमध्ये एक लिटर पेट्रोल २६ रुपये २१ पैसे म्हणजेच ०.३४५ डॉलरला विकत घेतले जाते.


कझाकस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत ३१ रुपये ६ पैसे म्हणजेच ०.४०९ डॉलर आहे.


इराणमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत ३ रुपये ८७ पैसे म्हणजेच ०.०५१ डॉलर आहे.


अल्जेरियामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत २४ रुपये ४६ पैसे म्हणजेच ०.३२२ डॉलर आहे.


अंगोलामध्ये एक लिटर पेट्रोलचा दर २६ रुपये ६६ पैसे म्हणजेच ०.३५१ डॉलर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies