Type Here to Get Search Results !

"या" संग्रहालयाचे नाव आता पंतप्रधान संग्रहालय...!



नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील नेहरु संग्रहालयाचे नाव बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हे संग्रहालय आता पंतप्रधान संग्रहालयाच्या नावाने ओळखले जाईल. संग्रहालयात सर्व १४ माजी पंतप्रधानांच्या आठवणींचा संग्रह करण्यात येणार आहे. येत्या १४ एप्रिलला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान या संग्रहालयाचे उद्घाटन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.



 केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना १९६४ मध्ये किशोर मूर्ती हाऊस परिसरात करण्यात आली होती. आता या संग्रहालयात देशाच्या सर्व १४ माजी पंतप्रधानांच्या आठवणींचा संग्रह करण्यात येणार आहे. देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांचे  योगदान स्वीकारण्यासाठी एनडीए सरकारने हे पाऊल उचलले आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies