Type Here to Get Search Results !

गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावर केली पुष्पवृष्टी!

 







सांगली: सांगली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरून आज भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार आक्रमक  भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. त्यासोबत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह धनगर समाजातील शेकडो कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील उभा केला  होता.


त्याचप्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यास आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार विरोध दर्शवला होता. पाच मेंढपाळांच्या हस्ते हे लोकार्पण केले जावे, अशी त्यांनी मागणी लावून धरली होती व त्याचप्रमाणे, लोकार्पणासाठी ते पुतळ्याकडे जात असताना त्यांना पोलिसांनी मल्हारराव चौकात रोखून धरल्याने खूप वेळ गोंधळ सुरू होता. शेवटी आम्ही अहिल्यादेवींच्या पुतळ्यावर मेंढपाळाच्या हस्ते ड्रोनच्या मदतीने पुष्पवृष्टी केली असल्याचे सांगत, पडळकर यांनी लोकार्पण झाले असल्याची माहिती दिली आहे. यावेळी उपस्थिती कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून व झेंडे फडकावून आनंदोत्सव साजरा केला आहे. तसेच, घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे


 


तसेच, “आता आपण डिजिटल इंडियामध्ये वावरतो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणने आहे की डिजिटल इंडिया झाला पाहिजे. पोलीस प्रशासन आज आम्हाल विरोध करत आहे. महिला पोलिसांना समोर करण्यात आले आहे, म्हणजे आमचा त्यांच्यासोबत वाद झाल्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल करता येतील. परंतु मेंढपाळाच्या हस्ते ड्रोनमधून गुलाबाची फुले अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावरती टाकून हा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे. आमचा हेतू स्पष्ट होता तो पूर्ण झाला. आम्ही मेंढपाळाच्या हस्ते डिजिटल इंडियामध्ये ड्रोनचा वापर करून, आम्ही त्या स्मारकावरती फुले टाकली उद्घाटन केले. पोलिसांशी संघर्ष केला नाही. सरकार जरी चुकीचे वागले तरी आम्ही चुकीचे वागणार नाही.” अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies