Type Here to Get Search Results !

चमकदार त्वचेसाठी नैसर्गिक फेसपॅक ठरतील फायदेशीर; जाणून घ्या कसे बनवायचे ‘हे’ फेसपॅक!

 


 

 

आटपाडी: आजकाल वाढते प्रदूषण, धावपळीचे जीवन, चुकीच्या सवयी, सकस आहाराचे प्रमाण कमी यांचा परिणाम शरीरासह आपल्या त्वचेवरदेखील सहज दिसून येत असतो. सर्वानाच, नितळ चमकदार त्वचा आपला चेहरा नैसर्गिकरित्या व्हावा असे वाटत असतेच. यासाठी अनेकदा बाहेरील कृत्रिम प्रोडक्टवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असतो. मात्र त्यातूनही कृत्रिम प्रोडक्टमुळे त्वचेवर दुष्परिणामांचा धोका असतोच. प्रत्येकाच्या त्वचेचे गुणधर्म वेगवेगळे असल्याने साहजिकच बाहेरील रासायनिक घटकांमुळे त्वचेवर पुरळ, लाल चट्टे, त्वचेची आग होणे हे दुष्परिणाम दिसून येतात. परंतु तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरातीलच काही घटक वापरुन घरगुती पध्दतीने नैसर्गिक फेसपॅक तयार करु शकतात.



म्हणून, या फेसपॅकसाठी तुम्हाला तीन लहान चमचे दही दोन मोठे चमचे ओटमीलची आवश्यकता असेल. ओट्सला बारीक करुन दह्यासोबत मिळून घ्या. या मिश्रणाला चेहर्यावर लावा 20 मिनिट ठेवल्यानंतर साध्या पाण्याने धूवावे. आठवड्यातून दोनदा या पध्दतीने हा फेसपॅक लावावा.



तसेच, एक मोठा चमचा लिंबूचा रस, तीन मोठे चमचे दूध चिमुटभर हळद लागेल. एका भांड्यात हे सर्व मिश्रण एकत्र करा कापसाने आपल्या चेहर्यावर हा फेसपॅक लावावा. त्यानंतर हे मिश्रण कोरडे झाल्यावर साध्या पाण्याने धुवावे. आठवड्यातून दोन वेळा याचा वापर करु शकतो.



त्याचप्रमाणे, अंडी आणि बदामाचा  चेहर्यावर हा फेसपॅक लावावा. तो बनवण्यासाठी पाच भिजवलेले बदाम कुटून घ्यावेत. त्यानंतर एक अंड फेटून हे दोन्ही घटकांचे एकत्र मिश्रण करावे. त्यानंतर चेहरा गळ्यावर हे मिश्रण लावून 20 मिनिटांनी साध्या पाण्याने धूवावे, आठवड्यातून तीन वेळा हा प्रयोग करा.



तसेच,  अजून दोन उकळून बारीक केलेले गाजर एक मोठ्या चमचा मधाची गरज आहे. हे मिश्रण एकत्र करुन चेहरा गळ्यावर 20 मिनिटे लावावे, नंतर साध्या पाण्याने धुवावे. आठवड्यातून 3 वेळा याचा उपयोग करावा, वरील या सगळ्या नैसर्गिक उपायाने तुमची त्वचा  नितळ चमकदार होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies