Type Here to Get Search Results !

दुकानदारावर खुश होऊन ग्राहकाने दिले ३८ हजारांचे बक्षीस!




नवी दिल्ली : अनेकदा आपण एखाद्या दुकानात गेल्यानंतर खूश होऊन दुकानदाराला टीप देतो आणि त्याच्या कामाचं कौतुक करतो. साधारणपणे काही रुपयांमध्ये ही रक्कम असते. पण कधी कुणी दुकानदाराला हजारो रुपये टिपमध्ये दिल्याचं ऐकलं आहे का? परंतु थायलंडमध्ये एका व्यक्तीने चक्क ३८ हजार रुपये टीप म्हणून दिल्याचं समोर आले आहे. त्या व्यक्तीने एकूण पाचशे डॉलर टीप म्हणून दिले आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे .


 

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडीओ थायलंडमधल्या एका सॅंडवीच शॉपमधला आहे. एका  युट्यूबर ग्राहक या सॅंडवीच शॉपमध्ये आला होता सुरूवातीला युट्यूबर ग्राहक दुकानदाराला पाणी मागतो. दुकानदार लगेच ग्राहकाला पाणी देतो, त्यानंतर ग्राहक म्हणतो की मला सँडविच पाहिजे. पण मी अर्ध्या तासानंतर पैसे देईन असे सागतो . दुकानदारही त्या ग्राहकाचं म्हणणं ऐकतो आणि नंतर  होकार देतो.



परंतु ,अशा स्थितीत ग्राहक त्याला विचारतो की, तू माझ्यावर विश्वास का ठेवलास, तेव्हा दुकानदार म्हणतो की तू चांगला आणि विश्वासू दिसत आहे . यानंतर, ग्राहकाने विचारले की इथे काम करताना सर्वात मोठी समस्या काय आहे, तेव्हा दुकानदार सांगतो की इथे भाडे खूप आहेत . हे ऐकून ग्राहक त्याला पाचशे डॉलर देतो आणि म्हणतो की, तू माझ्याशी खूप चांगलं वागलास, म्हणून मी हे तुला देत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies