Type Here to Get Search Results !

सांगलीत रस्ताच्या कडेला बेवारस बाळ सापडले!




सांगली : सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे वायफळे रस्त्यालगत बेवारस टाकून दिलेले  स्त्री जातीचे चार महिन्याचे बाळ सापडले आहे. गावातील लोक सोमवारी पहाटे 6 च्या दरम्यान व्यायामाला जात असताना रस्ताच्या कडेला हे बाळ सापडले आहे . ग्रामस्थांनी लवकरच  हे बाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन प्रथम उपचार करून तासगाव पोलिसांच्या  ताब्यात दिले. तासगाव पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील उपचारासाठी बाळास सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.




बलगवडे ते वायफळे रस्त्यालगत गावाबाहेर रस्ताच्या कडेला हे बाळ दाट झाडीत फेकून दिलेले ग्रामस्थांना सापडले. बाळाच्या तोंडाला छोटीशी जखम झाली होती. बाळाच्या कपड्याला धूळ, कुसळे व काटे लागले होते. बाळ थंडीने कुडकडत जोरजोरात रडत होते. सकाळच्या वेळेस  व्यायामासाठी गेलेल्या लोकांच्या लक्षात ही गोष्ट आली. सामाजिक कार्यकर्ते अरविंद पाटील, राजेंद्र रास्ते, सूरज शिंदे यांनी त्वरित त्याला गावातील उपकेंद्रात नेले आहे.  आरोग्य कर्मचारी शुभांगी मोहिते आणि हेमलता जगताप यांनी प्रथमोपचार केले आहे .



यानंतर माजी पोलीस पाटील रघुनाथ पाटील, सरपंच जयश्री पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरविंद पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यास याबाबत माहिती दिली आहे .तासगाव पोलीस घटनास्थळी पंचनामा केला आहे . याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाला पुढील उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies