Type Here to Get Search Results !

पुण्यात उद्यापासून हेल्मेट सक्ती; जाणून घ्या सविस्तर माहिती



पुणे: पुण्यात आता हेल्मेट सक्ती  करण्यात आली आहे. शासकीय कर्मचारी, शाळा, कॉलेज, महानगरपालिका, महाविद्यालयात हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. ४ वर्षांवरील सर्वांना हेल्मेट सक्तीचे असणार आहे. उद्यापासून हे नियम लागू होणार आहेत. जनतेस मार्गदर्शक ठरावे या दृष्टीने तसेच सह प्रवाशाच्या सुरक्षिता सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना किंवा ये जा करताना हेल्मेट आवश्यक असणार आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश काढले आहेत. या नियमाचे उल्लंघन केल्यास गंभीर नोंद घेण्यात येईल असे  नमूद करण्यात आले आहे.



अपघातात सर्वात जास्त अपघात दुचीकी चालवणाऱ्याचा  होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार तसेच न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोठेही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालवणा-या तसेच पाठीमागे बसणा-राया व्यक्तीला हेल्मेटचा वापर बंधनकारक आहे. .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies