Type Here to Get Search Results !

दहिसर ते आरे मेट्रो प्रवास रविवारपासून सुरु; गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उद्घाटन!





मुंबई :‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील डहाणूकरवाडी ते आरे आणि मेट्रो ७  मार्गिकेतील दहिसर ते आरे टप्प्याचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, पण  शनिवारी संध्याकाळी उद्घाटन होणार असल्याने त्याच दिवशी सेवा सुरू करणे शक्य नव्हते म्हणून रविवारपासून प्रवासी वाहतूक सुरू केली जाणार आहे.



पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी दूर करून प्रवास वेगवान करण्यासाठी ‘मेट्रो २’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला होता . ‘मेट्रो २’ मार्गिकेअंतर्गत दहिसर ते डी. एन. नगर अशी ‘मेट्रो २ अ’ मार्गिका बांधली जात आहे. त्याच वेळी दहिसर ते अंधेरी अशी ‘मेट्रो ७’ मार्गिकेचेही बांधकाम सुरू आहे. या दोन्ही मार्गिका याआधीच वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना आणि इतर तांत्रिक कारणांमुळे प्रकल्पास विलंब झाला. आता मात्र शनिवारी  म्हणजे उद्या ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मधील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे आणि रविवारपासून म्हणजे ३ एप्रिलपासून प्रवासी वाहतुकीला सुरुवात होईल.



प्रवासी वाहतुकीला सुरुवात करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मात्र शनिवारी संध्याकाळी उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर तात्काळ सेवा सुरू करणे अशक्य आहे. त्यामुळे रविवारी सकाळी ६ वाजल्यापासून दहिसर ते आरे मार्गावर मेट्रो सेवा सुरू होईल. सध्या पहिल्या टप्प्यासाठी ११ गाडय़ा असून वर्षभरात आणखी २० गाडय़ांची भर पडेल. महत्त्वाचे म्हणजे या मार्गिकेमुळे पश्चिम द्रुतगती मार्ग आणि उपनगरांतील वाहतूक अडचणी कमी होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies