Type Here to Get Search Results !

सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष यांना ‘ईडी’कडून नोटीस....

  



सोलापूर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे माढय़ाचे  आमदार बबनराव शिंदे व त्यांचे पुत्र रणजितसिंह हेसुध्दा सक्तवसुली संचालनालयाच्या  चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.


सलग सहाव्यांदा विधानसभेवर प्रतिनिधित्व करणारे आमदार बबनराव शिंदे हे बडे साखर कारखानदार असून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात जवळपास सहा साखर कारखाने आहेत. शिवाय एका सहकारी बँकेसह शिक्षण संस्था व इतर खासगी उद्योग शिंदे कुटुंबीयांशी निगडित आहेत. आमदार रणजितसिंह शिंदे हे सध्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष आहेत. शिंदे पिता-पुत्राविरूध्द माढा तालुक्यातील त्यांचे विरोधक नागनाथ कदम यांनी यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप करून संबंधित यंत्रणांकडे चौकशीची मागणी केली होती. 


यात माढय़ाची जगदंबा मागासवर्गीय शेतकरी सहकारी सूतगितणीच्या मालमत्ता खरेदी प्रकरणासह साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या नावे परस्पर काढलेले कोटय़वधींचे कर्ज प्रकरण, शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या नावाखाली झालेला घोटाळा व अन्य प्रकरणे कदम यांनी ईडीकडे सादर करून शिंदे पितापुत्राची चौकशीची मागणी केली आहे. त्यानुसार ईडीने शिंदे पितापुत्रांना आतापर्यंत तीनवेळा नोटिसा बजावून चौकशीसाठी बोलावले होते.   दरम्यान, याप्रकरणी जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी, ईडी चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार आहोत. द्वेषभावनेतून खोटय़ा तक्रारी केल्या जात आहेत असे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies