Type Here to Get Search Results !

‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीच्या चुरशीच्या सामन्यात इंग्लंडवर जोरदार मात; भारताचा सलग दुसरा विजय!नवी दिल्ली: उपकर्णधार हरप्रीत सिंगची हॅट्ट्रिक आणि कर्णधार मनप्रीत सिंगच्या गोलच्या जोरावर भारतीय पुरुष संघाने रविवारी म्हणजेच काल  ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीच्या चुरशीच्या सामन्यात इंग्लंडवर ४-३ अशी जोरदार मात केली. हा भारताचा इंग्लंडवर दोन दिवसांत सलग दुसरा विजय ठरला आहे.प्राप्त माहितीनुसार, भारताने शनिवारी ३-३ अशा नियमित वेळेतील बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडवर ३-२ अशी जोरदार सरशी साधली. त्यांनी रविवारीही अप्रतिम खेळ सुरू ठेवताना पुन्हा विजयाची नोंद केली आहे. पहिल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यातही इंग्लंडने पहिला गोल केला. लियाम सॅन्फोर्डने सहाव्या मिनिटाला गोल करत इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु, आक्रमण फळीच्या दमदार खेळामुळे भारताला दमदार पुनरागमन करण्यात जोरात यश आले.१५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार मनप्रीतने केलेल्या गोलमुळे भारताने सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. उपकर्णधार हरमनप्रीतने २५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरच्या साहाय्याने दोन गोल झळकावत भारताला मध्यांतराला ३-१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.उत्तरार्धात इंग्लंडने आक्रमणाचा वेग वाढवत भारताच्या बचाव फळीवर दडपण टाकले. ३८व्या मिनिटाला डेव्हिड कॉन्डोनने इंग्लंडचा दुसरा गोल केला. परंतु, पुन्हा हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर अचूक वेध साधत गोल वैयक्तिक हॅट्ट्रिक पूर्ण करताना भारताला ४-२ अशी आघाडी मिळवून दिली. परंतु पुढच्याच मिनिटाला सॅम वॉर्डने केलेल्या गोलमुळे इंग्लंडने पुन्हा भारताची आघाडी कमी केली. त्यांनी १५ मिनिटांच्या शेवटच्या सत्रातही गोल करण्याचे बरेच प्रयत्न केले. पण या संपूर्ण स्पर्धेत लौकिकाला साजेसा खेळ न केलेल्या भारताच्या बचाव फळीने अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे इंग्लंडला चौथा करण्यात अपयश आले आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies