Type Here to Get Search Results !

आजचे राशिभविष्य! सोमवार ४ एप्रिल २०२२! जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

 




मेष:-

कामातील बदल जाणून घ्यावेत. सरकारी कामे मार्गी लागतील. मौल्यवान वस्तू जपून ठेवाव्यात. तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील.  आवडीचे पदार्थ चाखाल.


वृषभ:-

फार दूरचे विचार करू नका. साहित्याची आवड जोपासता येईल. भावंडांना बाहेर गावी जाण्याचे योग येईल. मैत्रीतील आपुलकी वाढेल. जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल.


मिथुन:-

व्यापारात चांगला लाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने मार्गक्रमण कराल. व्यापारात चांगला लाभ होईल. कमिशनचा लाभ उठवावा. क्षणिक सौख्याचा आनंद घ्याल.


कर्क:-

स्त्री वर्गाचा सहवास लाभेल. पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. नवीन मित्र जोडले जातील.. उत्तम वाहन सौख्य लाभेल. 


सिंह:-

महिलावर्ग मनाजोगी खरेदी करेल.घरासाठी सजावटीच्या आकर्षक वस्तू खरेदी कराल. तुमच्या कलागुणांचे कौतुक केले जाईल. चांगले साहित्य वाचनात येईल. 


कन्या:-

मनात नवीन कल्पना रुजतील.इतरांना मनापासून मदत कराल. चारचौघांत तुमची कला सादर करता येईल. योग्य विचारांची जोड घ्यावी. धार्मिक साहित्य वाचाल. 


तूळ:-

लॉटरीचे तिकीट घ्याल. धनलाभ संभवतो. हातातील कामे पूर्ण होतील.घरगुती प्रश्न समजून घ्यावेत. अपचनाचा त्रास जाणवेल. 


वृश्चिक:-

व्यवसाय वृद्धीचा मार्ग आखावा. नोकरीच्या ठिकाणी तुमचा दबदबा वाढेल. कामातून आत्मिक समाधान लाभेल. पत्नीचे प्रेमळ सौख्य लाभेल. मुलांचा खोडकरपणा वाढेल.


धनू:-

बोलण्याचा भरात नवीन जबाबदारी अंगावर घ्याल. हाताखालील लोकांकडून कामे करून घ्याल. कौटुंबिक खर्चाचे गणित नव्याने मांडावे. मित्र मंडळींचा गोतावळा जमवाल. जुगाराची आवड जोपासाल.


मकर:-

कामातील अडथळे प्रयत्नपूर्वक दूर करावेत.कामाचा फार ताण घेऊ नका. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. स्वत: मध्ये काही बदल करून पहावेत. पित्ताचा  विकार  जाणवेल.


कुंभ:-

सामाजिक बांधीलकी जपावी. तुमची हिंमत वाढीस लागेल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. धाडसाने कामे पूर्ण कराल. वादावादीत सहभाग घेऊ नका.


मीन:-

अधिकारी व्यक्तीचा सल्ला विचारात घ्या. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.  मित्रांचा रोष वाढवून घेऊ नका. मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक चंचलता जाणवेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies