Type Here to Get Search Results !

ट्रकला कार धडकल्याने भीषण अपघात; पोलीस शिपायाचा जागीच मृत्यू!




सोलापूर: सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर सारोळे पाटीजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मालमोटारीवर पाठीमागून कार आदळून घडलेल्या भीषण अपघातात सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील एका पोलीस शिपायाचा सख्ख्या भावासह जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या पत्नी मुलांसह चौघेजण जखमी झाले. आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे.



पंढरपूर येथेल विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना हा अपघात झाला आहे. दयानंद आण्णाराव बेलाळे त्यांचे वय ३० वर्षे असून ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई होते त्यांचे भाऊ सचिन आण्णाराव बेलाळे त्यांचे वय ३२ वर्षे होते. ते दोघेजण रोखडा सावरगाव येथील राहणारे होते. अशी या अपघातात मृत्युझलेल्या दोनी भावांची नावे आहेत. तर त्यांच्या पत्नी राणी ऊर्फ स्वाती सचिन बेलाळे दीपाली ऊर्फ जयश्री दयानंद बेलाळे तसेच त्यांची मुलगी त्रिशा वर्षांची मुलगा श्लोक वर्षांचा हे चौघेजण जखमी झाले असून त्यांना सोलापुरात वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले आहे.

 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies