Type Here to Get Search Results !

आजचे राशिभविष्य! शुक्रवार, १ एप्रिल २०२२ ! जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

 



मेष:-

आवडीच्या गोष्टी खरेदी कराल. वाचनातून रहस्यमय गोष्टींची आवड पूर्ण कराल. जास्त विचार करणे टाळावे लागेल. कामाचा तणाव वाढल्याने थकवा जाणवेल. आपली संगत तपासून पहावी. 



वृषभ:-

तरुण वर्गाचे मत विचारात घ्याल.कामात चिकाटी ठेवावी लागेल. व्यापार्‍यांना चांगला लाभ मिळेल. आर्थिक गणिते मनाजोगी पूर्ण होतील. नवीन लोकांशी संपर्क वाढेल.  



मिथुन:-

मनातील इच्छा पूर्ण होतील. कमिशनमधून चांगला लाभ होईल. छुप्या शत्रूंचा त्रास जाणवेल. मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.



कर्क:-

थोर व्यक्तींचा सहवास लाभेल. अधिकारी व्यक्तींचा सल्ला मिळेल. प्रवासाची आवड पूर्ण कराल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल. तुमच्या बोलण्याची उत्तम छाप पडेल.



सिंह:-

मनातील अकारण आलेली भीती काढून टाकावी. वडीलधार्‍यांचा योग्य मान ठेवाल. अति विचाराने मानसिक तान येऊ शकतो. लहान-सहान गोष्टींनी नाराज होऊ नका. आवडणार्या गोष्टीसाठी वेळ द्यावा.



कन्या:-

सहकुटुंब जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.भागीदाराशी सलोखा वाढेल. नवीन व्यावसायिक धोरण ठरवाल. पत्नीशी मनमोकळ्या गप्पा होतील. 



तूळ:-

काही कामे कमी कष्टात पार पडतील. जोडीदाराची आवक वाढेल. कौटुंबिक शांतता जपावी. कफ विकारांपासून काळजी घ्यावी.अपचनाचा त्रास जाणवेल. 



वृश्चिक:-

जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. पत्नीच्या सहवासात रमून जाल. खर्चाचा आकडा वाढू शकतो. वाहन चालवताना काळजी घ्यावी. व्यावसायिक पाऊले जपून उचलावीत.



धनू:-

घरातील वातावरण आनंदी राहील. कामे आनंदात पार पडतील. दिवसभर कामात गुंतून राहाल.कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. मनातील गैरसमज काढून टाकावेत.


मकर:-

शांत व संयमी विचार करावा.भावंडांची मदत घ्यावी लागेल. आततायीपणे कोणतेही काम करू नका. हातून चांगले लिखाण होईल.



कुंभ:-

बोलण्यातून सर्वांचे मन जिंकून घ्याल.आवडी बाबत आग्रही राहाल. सामाजिक बांधीलकी जपाल. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. बाग-बगीच्याच्या कामात मन गुंतवाल.



मीन:-

आपले कर्तव्य उत्तम पार पाडाल. हजरजबाबीपणे उत्तरे द्याल. सर्वांशी लाडिकपणे बोलाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मैत्रीचे संबंध जपावेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies