Type Here to Get Search Results !

कोव्हॅक्सिनच्या पुरवठय़ास ‘डब्ल्यूएचओ’ची स्थगिती;जाणून घ्या सविस्तर माहिती .......हैदराबाद : लस उत्पादन प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्यानंतर भारत बायोटेकनिर्मित कोव्हॅक्सिन लशीचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी घेतला. संयुक्त राष्ट्रांच्या खरेदीदार संस्थांच्या माध्यमातून अनेक देशांना या लशीचा पुरवठा करण्यात येत होता. तो आता स्थगित करण्यात आला आहे.ज्या देशांना कोव्हॅक्सिन लशी मिळाल्या आहेत त्यांनी वापराबद्दल योग्य तो निर्णय घेण्याची सूचनाही जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरासाठी १४ ते २२ मार्चदरम्यान करण्यात आलेल्या तपासणीतील निष्कर्षांनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या लशीच्या उत्पादन पद्धतीच्या गुणवत्तेत काही त्रुटी आढळल्याने उत्पादनप्रक्रिया आणि साधनसुविधा अद्ययावत करण्याची गरजही जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.आमच्याकडील उपलब्ध माहितीनुसार ही लस प्रभावी आहे. तिच्या सुरक्षिततेबद्दल कोणतेही प्रश्नचिन्ह नाही. या लशीचे जोखीम मूल्यांकन केले असले तरी जोखीम आणि लाभ यांच्या गुणोत्तरात कोणताही बदल आढळलेला नाही, असेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच केलेल्या तपासणीदरम्यान लसउत्पादन प्रक्रियेत सुधारणा करण्यास वाव असून, त्या लवकरच केल्या जातील असे भारत बायोटेकने तपासणी पथकापुढे मान्य केले होते. लस उत्पादनाच्या गुणवत्तेतील त्रुटी शोधून, त्यात सुधारणा करण्याबरोबरच त्या त्रुटी पुन्हा उद्भवू नयेत, अशी याची खबरदारी घेऊन तसा अहवाल भारताचे केंद्रीय औषध महानियंत्रक आणि जागतिक आरोग्य संघटनेकडे सादर करण्याचे भारत बायोटेकने मान्य केले आहे.आरोग्य संघटनेचे म्हणणे..


कोव्हॅक्सिन लशीच्या उत्पादन पद्धतीच्या गुणवत्तेत काही त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे लस उत्पादन प्रक्रियेत सुधारणा करण्यास वाव आहे. उत्पादनप्रक्रिया आणि साधनसुविधा अद्ययावत करण्याची गरज आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies