Type Here to Get Search Results !

गेल्या दहा दिवसांत; इंधनदरात साडेसहा रुपयांनी वाढ!





नवी दिल्ली: इंधन दरवाढीचे सत्र कायम सुरु आहे , गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलदरात प्रत्येकी ८० पैशांची वाढ करण्यात आली होती , त्यामुळे गेल्या दहा दिवसांत इंधन ६ रुपये, ४० पैशांनी महागले आह़े. निवडणूक काळातील साडेचार महिन्यांच्या दरस्थिरतेनंतर, २२ मार्चपासून पुन्हा इंधन दरवाढ सुरू करण्यात आली आहे.  पेट्रोल आणि डिझेलदरात गुरुवारी ८० पैशांनी वाढ करण्यात आल्याने मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ११६. ७२ रुपये आणि डिझेल १००. ९४ रुपये इतके झाले आहे तर, दिल्लीत पेट्रोल १०१. ८१ रुपये, तर डिझेल ९३. ०७ रुपयांवर पोहोचले आहे.


 

गेल्या दहा दिवसांत नऊ वेळा इंधन दरवाढ करण्यात आली आह़े. या कालावधीत इंधनदरात सुमारे साडेसहा रुपयांनी वाढ झाल्याने महागाईत आणखीच वाढत आहे. या  दरम्यान, काँग्रेसने सरकारने गुरुवारी इंधन दरवाढीविरोधात देशभर आंदोलन केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies