Type Here to Get Search Results !

CNG आजपासून 6 रुपयांनी स्वस्त ; जाणून घ्या!










मुंबई : एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या अकरा दिवसांमध्ये तब्बल नऊ वेळेसे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. परंतु दुसरीकडे राज्यातील जनतेला दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे व्हॅट कमी करण्यात आल्याने आजापासून सीएनजी आणि पीएनजीचे दर स्वस्त झाले आहेत. जीएनजीच्या दरात सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात साडेतीन रुपयांची घसरण झाली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये सीएनजीवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच सीएनजीवरील व्हॅट कमी करण्याची अधिसूचना देखील काढण्यात आली होती. अखेर आजापासून आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार सीएनजीमध्ये सहा रुपयांची तर पीएनजीमध्ये साडेतीन रुपयांची घसरण झाली आहे. मुंबईत आता सीएनजीची किंमत साठ रुपये प्रति किलो झाली आहे.



परंतु एकीकडे राज्यात सीएनजीचे दर स्वस्त झाले आहेत तर दुसरीकडे मात्र व्यवसायिक गॅसच्या दरात प्रति सिलिंडर 250 रुपयांची वाढ झाली आहे. एप्रिलच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे नवे दर सुरु करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर असून, व्यवसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी OMCs ने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून व्यवसायिक सिलिंडरच्या दरामध्ये तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 22 मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती, तर व्यवसायिक सिलिंडर स्वस्त झाले होते.परंतु  आज घरगुती सिलिंडरचे दर स्थिर असून, व्यवसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies