‘या’ तरुणाला पोलीस अधिकारी होताच शिक्षिकेने बक्षीस म्हणून दिले 1100 रूपयेनवी दिल्ली - जेव्हा एखादा शिक्षक आपल्या वर्गात विद्यार्थ्यांना शिकवत असतो, तेव्हा त्याला नेहमी वाटत असते की आपल्या विद्यार्थ्याने मोठे व्हावे आणि चांगल्या ठिकाणी नोकरी करावी, जेणेकरून शाळेचे नाव उज्वल व्हावे. असं स्वप्न पूर्ण झाल्यावर ते शिक्षकही अभिमानाने सर्वांना सांगतात. एखाद्या विद्यार्थ्याने वर्गात वाईट कृत्य केले तर त्याला शिक्षकही समजावून सांगतात की त्याने चांगला अभ्यास करावा म्हणजे भविष्यात त्याला डॉक्टर, पोलीस किंवा कोणतीही चांगली पोस्ट मिळेल. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. एक विद्यार्थी अनेक वर्षांनी पोलीस अधिकारी म्हणून त्याच्या शाळेत परत आला आहे. 

सोशल मीडियावर  व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांचा गणवेश घातलेला एक तरुण शाळेच्या वर्गात उभा आहे. पोलीस अधिकारी झाल्यानंतर हा तरुण त्याच्या शाळेत भेट द्यायला आला आहे आणि त्याला पाहून सर्वजण खूप खूश होतात. त्या सर्वांपैकी सर्वांत जास्त आनंद हा शाळेतील एका शिक्षिकेला झाल्याचे  दिसते. ती शिक्षिका त्या तरुणाची ओळख वर्गातील विद्यार्थ्यांची करून देते. तसंच त्या मुलाचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा, असंही सांगते.


 "या मुलाने फक्त देशाचंच नाही तर त्याच्या आई-वडिलांचं आणि समाजाचंही नाव उज्ज्वल केलंय. तुम्ही सर्वांनी त्याचा आदर्श घ्या आणि त्याच्यासारखे बना. तुम्हीही मोठी व्यक्ती व्हाल आणि तुम्हालाही योग्य सन्मान मिळेल" असं शिक्षिकेने विद्यार्थ्यांना सांगितलं आहे. तसेच शिक्षिका बोलत असताना त्यांच्या हातात काही पैसे दिसत आहेत. त्यांचं बोलून झाल्यानंतर वर्दीतला तरुण शिक्षिकेच्या पाया पडतो, त्यानंतर शिक्षिका हातातले पैसे या तरुणाला बक्षीस म्हणून देतात.


 शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्याला 1100 रुपये बक्षीस म्हणून दिल्याची माहिती मिळत आहे. यावेळी तरुण आणि शिक्षिका खूप खूश दिसत आहेत. तर वर्गात उपस्थित मुलं टाळ्या वाजवू लागतात.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured