टँकरमध्ये दूध भरत असताना पाच जणांचा मृत्यूजळगाव: मुक्ताईनगरजवळ झालेल्या अपघातात पाच जणचा  मृत्यू झाला  आहे. पहाटेच्या वेळी महामार्गावर हा अपघात झाला. दूधाच्या टँकरला ट्रकची धडक बसल्याने हा अपघात झाला आहे.


दुधाचा एक टँकर रस्त्यातच बंद पडला होता. त्यामुळे बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध भरण्याचे  काम सुरू होते. यावेळी एक ट्रक येऊन या टँकरला धडकला आणि यात ५ कामगारांचा मृत्यू झाला. या मृतांची माहिती अद्याप उपलब्ध नाहीत. मुक्ताईनगर परिसरात महामार्गावर हा अपघात झाला असून पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.मुक्ताईनगरजवळच्या घोडसगाव परिसरात पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured