Type Here to Get Search Results !

सिलिंडर दरवाढीची सर्वसामान्या लोकांना दगा



 मात्र, त्यात आता वाढ झाल्याने दर महिन्याला पैसे आणायचे तरी कोठून ? पेट्रोल, डिझेलच्या दरापासून खाद्य तेलापर्यंत आणि अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वांच्याच दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मासिक खर्च कसा भागवावा, असा प्रश्न पडला असतानाच गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने गृहिणींना खर्चासाठी कसरत करावी लागत आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीमध्ये १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीसह सिलिंडरचे दर आता ९९९.५० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येक जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढत आहेत. मात्र त्या तुलनेत उत्पन्न वाढत नाही. सरकारने किमान सर्वसामान्यांचा विचार करून तरी गॅस दर वाढीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नाही तर आम्ही कसे जगावे, ही तरी किमान सांगावे.

सर्वसामान्य नागरिक ग्रामिण भागातून शहरात पोट भरण्यासाठी आले आहेत. कसेबसे खर्च भागवून फक्त दिवस पुढे ढकलणे सुरु आहे. वाढत्या महागाईमुळे एक रुपया देखील शिल्लक राहत नाही. महागाईपुढे हात टेकले असून पुन्हा गावात जाऊन तिकडे रोजंदारीवर जावे असे वाटत आहे.

तेलाचा डबा घेण्यासाठी सुमारे तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. इतर वस्तूंचेही भाव वाढले आहेत. पेट्रोल वाढले तरी लगेच प्रत्येक वस्तूमागे एक-दोन रुपये वाढत आहेत. दर महिन्याला जर असे होत असेल तर खर्च कसा भागवावा, हा मोठा प्रश्न आहे. गॅस सिलिंडरवर अनुदानही मिळत नाही. एकही रुपयाची बचत होत नाही. अचानक काही अडचण आली तर पैसे कसे उभे करावेत. कोरोनामुळे आता कोणी उसने पैसे देण्यास तयार होत नाही.

वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीमध्ये गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ झाल्याने खर्चासाठी कसरत करावी लागत आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies