‘ओपन जीम’ संकल्पना चांगली

 नांदेड : सुदृढ व निरोगी शरीरासाठी व्यायाम हवा असतो. कोरोनानंतर तर निरोगी आयुष्य जणू सर्वांसाठीच महत्वाचे बनले आहे. त्यासाठी सरकारने शासकीय, निमशासकीय तसेच सार्वजनिक जागेवर कोट्यावधी रुपये खर्च करुन ‘ओपन जीम’ ही संपल्पना प्रत्यक्षात आणली आहे. नांदेड शहर आणि जिल्ह्यात देखील अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालय परिसर व सार्वजनिक जागेत ओपन जिम सुरु केल्या आहेत. परंतु नांदेडकरांना अजून तरी ‘ओपन जिम’ची संकल्पना तितकीची अंगवळणी पडलेली दिसून येत नाही.


सकाळी तसेच संध्याकाळच्या वेळी घराबाहेर फिरण्यास गेलेल्या नागरिकांना ओपन जिम अगदी सहज उपलब्ध आहे. त्यासाठी नागरीकांना कुठलेही पैसे मोजावे लागू नयेत म्हणून शासनाने विविध मोक्याच्या ठिकाणी या जीमची उभारणी केली. मात्र अनेक तरुण सायंकाळच्या वेळी व्यायाम करण्याच्या साहित्यावर बसून मोबाईलवर गप्पा मारताना दिसत आहेत.


ओपन जिम  ही संकल्पना सर्वांच्या आरोग्यासाठी खूप छान आहे. ओपन जिम  हे लहान मुले ज्येष्ठ नागरीक व महिलांसाठी देखील महत्वाचे आहे. त्याचा अनेकजण आनंद घेत आहेत. परंतु इथल्या महागड्या साहित्याची कुणाकडुन नासधुस होणार नाही. याची महापालिकेने खबरदारी घेतली पाहिजे व नागरीकांना वर्षानुवर्ष ही सेवा मिळत राहिली पाहिजे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured