सप्तपदीपासून मंगलाष्टकांपर्यंत! हृताच्या संपूर्ण लग्नाच्या शॉर्ट व्हिडीओ



 मुंबई : 'दुर्वा' होऊन 'फुलपाखरु'सारखी मराठी कलाविश्वात स्वच्छंदपणे वावरणाऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळेने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक प्रतिक शाह याच्यासोबत हृताने सप्तपदी घेत नव्या जीवनाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हृताने या लग्नसोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. हे फोटो पाहिल्यावर चाहते थक्क झाले असून सध्या तिच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.



लग्न झाल्यानंतर हृताने या सोहळ्यातील काही अविस्मरणीय क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहे. यामध्येच राजश्री मराठीने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर या लग्नसोहळ्याचा शॉर्ट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हृता-प्रतिकच्या सप्तपदीपासून ते मंगलाष्टकांपर्यंत प्रत्येक विधी थोडक्यात दाखवण्यात आली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे.


दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हृताने लग्नात पिवळ्या रंगाची साडी नेसल्याचे  पाहायला मिळाले . विशेष म्हणजे यावेळीदेखील तिने नेहमीप्रमाणे साधा सिंपल लूक कॅरी करुन नेटकऱ्यांचे  लक्ष वेधून घेतले. तसंच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा रंगल्याचे  दिसून आले. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured