Type Here to Get Search Results !

भारताच्या ‘या’ महिला बॉक्सिंग पटूचा जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत अंतिम प्रवेश



नवी दिल्ली : भारताच्या निखत झरीनने वर्चस्वपूर्ण विजयासह बुधवारी इस्तंबूल येथे चालू असलेल्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. परंतु उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यामुळे मनीषा मौन आणि परवीन हुडा यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 


उपांत्य सामन्यात निखतने आत्मविश्वासाने खेळ करीत ब्राझिलच्या कॅरोलिन डी अल्मेडाला ५-० असे सहज नामोहरम केले. कनिष्ठ विश्वविजेत्या निखतने संयमी खेळाचे प्रदर्शन करीत कॅरोलिनवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. पण, मनीषाने टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या इटलीच्या इरमा टेस्टाकडून ०-५ अशी हार पत्करली, तर परवीनने युरोपियन कांस्यपदक विजेत्या आर्यलडच्या एमी ब्रॉडहस्र्टकडून १-४ असा पराभव पत्करला.


 २०१९मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या मनीषाने दुसऱ्यांदा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळताना ताकदीने फटके खेळत तांत्रिक गुणाधिक्याच्या बळावर विजयासाठी प्रयत्नांची शर्थ केली. परंतु इरमापुढे तिचा निभाव लागला नाही.आतापर्यंत सहा वेळा विजेती एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी या महिला बॉक्सिंगपटूंनी जागतिक विजेतेपदे पटकावली आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies