Type Here to Get Search Results !

‘या’ अभिनेत्रीला झटका, कोट्यावधी रुपये खर्च करूनही ‘धाकड’ ठरला सुपरफ्लॉपअभिनेत्री कंगना रणौतने दमदार अभिनय करत चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं स्थान बळकट केलं. तिने काही सुपरहिट चित्रपटही बॉलिवू़डला दिले. प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत ठामपणे मांडण्यातही ही अभिनेत्री सरस ठरली. उत्तम भूमिकांमुळे नावारुपाला आलेली कंगना नवा कोरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून कंगनाच्या ‘धाकड’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची गणितं काही वेगळी पाहायला मिळाली.


२० मे २०२२ला ‘धाकड’ देशभरात जवळपास २२०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाच्या बाबतीत कंगना फ्लॉप ठरली. पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. पहिल्या दिवशी या चित्रपटाची कमाई जवळपास १ कोटी २० लाख रुपये एवढी  झाली. सकाळी ‘धाकड’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये जास्त गर्दी देखील नव्हती. कंगनाच्या इतर चित्रपटांच्या तुलनेमध्ये या चित्रपटाचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन फारच कमी होतं.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies