फास्ट फूड खाण्यासाठी मॅकडोनाल्ड्स मध्ये मिळणार महिन्याला एक लाख पगार

 


प्रत्येकाला वेगवेगळे फूड खाण्याची आवड असते. अनेकदा वेगवेगळ्या फूडची टेस्ट घेण्यासाठी आपण पैसे खर्च करत रेस्टॉरेंट मध्ये खायला जातो. पण जर वेगवेगळ्या फूडची टेस्ट करायला तुमच्याकडून पैसे घेण्याऐवजी तुम्हाला पैसे देत असेल तर? तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे.

ब्रिटनमध्ये मटेरियल मार्किट डॉट कॉम नावाची कंपनी टेक अवे टेस्टर या पदासाठी फूड टेस्टर बघत आहे. यात मॅकडोनाल्ड्स सबवे ग्रेग्स अशा प्रसिद्ध मील पॅक्सचा समावेश असेल. ज्याचा  पगार महिना एक लाख असणार आहे. या जॉब ऑफरची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. 


या नोकरीसाठी काही विशेष पात्रता नसणार आहे. उमेदवाराचं वय १८ वर्षापेक्षा जास्त असावं आणि उमेदवार प्रचंड फूड लवर असावा. जर तुम्ही फूड लव्हर असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.

मटेरियल मार्केट डॉट कॉम नावाची कंपनी असे लोक शोधत आहे. जे फास्ट फूड आउटलेट मैकडोनाल्डमध्ये जात तिथे एकशे एक डिश टेस्ट करण्यास तयार असणार. या कंपनीला ब्रिटनमध्ये सर्वात उत्तम फास्ट फूड कुठे मिळतात, हे जाणून घ्यायचं आहे. यासाठी कंपनी एक हजार पाउंड वेतन देणार जे भारतीय रुपयांनुसार एक लाख वेतन असणार.

ही नोकरी करणाऱ्या व्यक्तीला आपल्यासोबत एक डायरी ठेवावी लागेल. त्यांनी खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर तो कसा वाटला ते त्या डायरीत लिहून ठेवायचं आहे. नोकरीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तो आपला रिपोर्ट मार्केटप्लेसला देईल ज्यावर न्यूट्रिशनिस्ट काम करतील.

विशेष म्हणजे ही नोकरी फक्त एका महिन्यासाठी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2022 आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured