मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या १५० च्या वरमुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या जवळपास १५० च्याही वर गेली आहे. बाधितांचे प्रमाणही अडीच %पेक्षाही जास्त झाले आहे.

शहरात मेच्या पहिल्या आठवडय़ामध्ये दैनंदिन रुग्णसंख्या १०० च्या घरात गेली. त्यानंतरही वाढ कायम राहिली आहे. मागील काही दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख १५० वर गेला आहे. मंगळवारी दिवसभरात १६६ रुग्ण नव्याने आढळले आहेत. तिसरी लाट ओसरत असताना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात दैनंदिन रुग्णसंख्या एवढी आढळत होती. त्यानंतर जवळपास अडीच महिन्यांमध्ये पुन्ही ही स्थिती निर्माण झाली आहे.

रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे बाधितांचे प्रमाणही वाढत आहे. मेच्या पहिल्या आठवडय़ात बाधितांचे प्रमाण एक % होते. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने हे प्रमाण आता अडीच %पेक्षाही जास्त झाले आहे.

शहरात मागील आठ दिवसांत सर्वात जास्त १०४ रुग्ण वांद्रे पश्चिम भागात, तर १५३ रुग्ण अंधेरी पश्चिम येथे आढळले आहेत. दादर, परेल, प्रभादेवी या भागांमध्ये रुग्ण जास्त संख्येने आढळत आहेत. कुर्ला पश्चिम आणि ग्रॅन्ट रोड या भागातही रुग्णसंख्या वाढत असल्याचे आढळले आहे.रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी शहरातील दैनंदिन चाचण्याचे प्रमाण मात्र अजूनही दहा हजारांच्या खालीच आहे.

मागील काही दिवसांत तर ते नऊ हजारांच्याही खाली गेले आहे.  मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी बहुतांश रुग्ण लक्षणविरहित असून घरीच कोरोनामुक्त होत आहेत रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्याही कमी म्हणजेच २९ इतकी आहे.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured