Type Here to Get Search Results !

बांधकाम स्टीलच्या किंमतीत मोठी घसरण, घर बांधणाऱ्यांसाठी खुशखबर!




मुंबई - लग्न बघावं करून आणि घर पाहावं बांधून, अशी म्हण आजही ग्रामीण भागात प्रचलित आहे. कारण, लग्न आणि घर या दोन्ही गोष्टी म्हणजे स्वप्न सत्यात उतरवणे असंच असते. त्यामुळेच, घर बांधताना सध्या बाजार भावात बांधकाम वस्तूंची, साहित्यांची किंमत किती आहे. या वस्तूंच्या किंमतीच्या कमी झालेल्या दरांचा अंदाज घेऊन माणूस घर बांधायला सुरुवात करतो. सध्या आपण घराचे बांधकाम काढले असेल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, बांधकामासाठी लागलेल्या स्टीलच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.

 सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीय नागरिकांचं आयुष्यच जणू या गोष्टींसाठी खर्ची होतं. कारण, मुलांची लग्न आणि घराचं बांधकाम हेच काय ते आयुष्याचं गणित असंत. म्हणून, घर बांधताना माणूस स्वस्त-महाग या बाबींचा विचार करतो. मात्र, युक्रेन-रशिया युद्धजन्य परिस्थिती गेल्या काही दिवसांपूर्वी बांधकाम साहित्य मोठ्या प्रमाणात महागलं होतं. बांधकाम स्टीलचे दरही मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यापाऱ्यांनी स्टॉक करणंही बंद केलं होतं. तर, या किंमती कमी करण्याची मागणीही सरकारकडे केली होती. 

मार्च महिन्यात बांधकाम स्टील म्हणजे सळयांची किंमत जवळपास 70 हजार रुपये प्रति टन म्हणजे 70 रुपये किलो होती. मात्र, मे महिन्यात या किंमतीत घट झाली असून एप्रिल महिन्यात 76 रुपये किलो असलेलं स्टील आता मे महिन्यात 61,525 रुपये टनांवर पोहोचले आहे. म्हणजेच, बाजारात 61-62 रुपये किलो दर आहेत. 

 बाजार भावात होत असलेल्या चढ-उतारामुळे व्यापाऱ्यांची कोंडी होत आहे. कारण, व्यापारी कंपनीकडून चढ्या दराने माल मागवतात. मात्र, गाडी दारात पोहोचेपर्यंत दर पुन्हा कमी झालेला असतो. याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांनी माल साठवणे बंद केल्याचे लोखंडवाला यांनी सांगितले. दरम्यान, सध्या स्टीलचे भाव कमी झाल्याने घर बांधकाम करणाऱ्यांना ही चांगली संधी आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies