Type Here to Get Search Results !

यमुना एक्सप्रेसवेवर अपघात

  


पुणे: उत्तर प्रदेशातील यमुना एक्स्प्रेसवर गुरुवारी पहाटे झालेल्या अपघातात चार महिलांसह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पहाटे 5 वाजता जेवार टोल प्लाझाच्या अलिकडे 40 किमीच्या परिघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच महामार्गावरील काहींनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. ट्रक आणि बोलेरो गाडीची भीषण धडक झाल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे.

 लगेच पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात नेल्यानंतर यातील पाच जणांना मृत घोषित करण्यात आले. सध्या अन्य दोघांवर कैलास रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे

सर्व दुर्घटनाग्रस्त व्यक्ती बारामतीच्या असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यातील बहुतेक साठीच्या वयातील आहेत. वाहन चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा संशय पोलिसांनी सांगितला आहे. चारचाकी ज्या ट्रकला धडकली तो पोलिसांनी जप्त केला आहे. चंद्रकांत बुराडे (६८), स्वर्णा बुराडे (५९), मालन कुंभार (६८), रंजना पवार (६०) आणि नुवंजन मुजावर (५३, कर्नाटक) अशी मृतांची नावे असून अन्य दोन व्यक्ती अत्यवस्थ आहेत.

या अपघाताबाबत आतापर्यंत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मृतदेह रुग्णालयात पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies