Type Here to Get Search Results !

पावसामुळे तारांबळ; रेल्वे प्रवाशांचे हाल; रस्त्यावर पाणी

 


मुंबई : पूर्व मोसमी पावसाने झोडपून काढल्याने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक आज कोलमंडले. मुंबईकडून येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या एक ते दोन तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना हाल सहन करावे लागत होते. कणकवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.


पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावल्याने आज जागोजागी पाणी साचले होते. या पावसाचा मोठा फटका रेल्वे प्रवाशांना बसला. कणकवली रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. या पाण्यातून वाट काढत प्रवाशांना पुढे सरकत जावे लागत होते. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर काही भागांमध्ये पत्र्याची शेड आहे. यातूनही गळती असल्यामुळे प्रवाशांना उभे राहावे लागत होते.


दोन-तीन वर्षांपासून प्लॅटफॉर्म एकवर छप्पर गळती आहे. ही परिस्थिती अजूनही तसेच आहे. उन्हाळी हंगाम संपून गेला तरी रेल्वेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रवाशांना आज गळती लागलेल्या फलाटावर बसावे लागले होते. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. फलाट क्रमांक दोनवर आज दादर ते सावंतवाडीकडे जाणारी रेल्वे दाखल झाली. याचवेळी पाऊस सुरू होता. त्यामुळे प्रवाशांना भिजत गाडीत चढावे लागले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies