''मुलीसारखा दिसतो'', कमेंट ऐकून राग आल्यावर झाल्याने वर्गमित्राची हत्या
चेन्नई : एका बारावीच्या विद्यार्थ्याने दिसण्यावरून टीप्पणी केल्यामुळे आपल्या वर्गमित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मुलाला ताब्यात घेतले आहे.


आरोपीच्या मित्राने त्याला मुलीसारखा दिसतो, असे  म्हटले  होते. आरोपीने त्यावर वारंवार आक्षेप देखील घेतला. पण, तो उघड उघड कमेंट करायचा. वर्गात त्याची नकळ उडवायचा. त्यामुळे आरोपीला राग आल्यावर त्याने मित्राला पार्टीसाठी बोलावले. त्यानंतर त्याची चाकूने वार करून हत्या केली. तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यात हायवेवर त्यांच्या शाळेजवळ हा प्रकार घडला.


बॉडी शेमिंगमुळे चिंता, नैराश्य येते. त्यामुळे राग आला होतो. यामधूनच ही हत्या झाली असावी, असे राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या डॉ. सरन्या जयमुमार म्हणाल्या. तसेच तमिळनाडूमध्ये विद्यार्थ्यांच्या वाईट प्रवृत्तीतून अशा घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांमधील हिंसाचार, दारू पिणे, शिक्षकांना शिवीगाळ करणे, वर्गात अनुचित वर्तन करणे असे अनेक प्रकार उघडपणे घडत आहे. 


राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वर्तणुकीशी संबंधित समस्यांमध्ये वाढ झाल्यामुळे शालेय शिक्षण मंत्री अनबिल महेश पोय्यामोळी यांनी गंभीर दखल घेतली आहे. शाळेत वाईट वागणूक दिसील तर शाळांमधून काढून टाकले जाईल, असा इशारा त्यांनी यापूर्वीच दिला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured