Type Here to Get Search Results !

महागाईचा आणखी एक धक्का CNG च्या दरात वाढ



नवी दिल्ली - सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे.कारण सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. इंद्रप्रस्थ गॅसने दिल्लीत  सीएनजीच्या दरात रुपयांनी वाढ केली आहे. सीएनजीच्या वाढलेल्या किंमती आजपासून लागू करण्यात येणार आहे.


 दिल्लीत 6 दिवसांत सीएनजीच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 15 मे रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. सध्या दिल्लीत एक किलो सीएनजीसाठी ग्राहकांना 75.61रुपये मोजावे लागतील.


 सध्या राष्ट्रीय राजधानीत वाहन चालवणे कठीण होत चालले आहे. पेट्रोलने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर सीएनजीच्या दरात वाढ होत आहे. सीएनजी गॅसच्या दरवाढीमुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या भाड्यात सतत् वाढ होत असून, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशात भर पडत आहे.


 पुण्यात सीएनजी दोन रुपयांनी महाग झाल्याने आता सीएनजीचे भाव प्रति किलो 80 रुपयांवर पोहोचले आहेत. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहे. या अगोदर पुण्यात सीएनजी दर 77.20 रुपये होते. तर दुसरीकडे नाशिक मध्ये सीएनजी दरात पुन्हा 3 रुपयांनी वाढ झाली आहे. आता सीएनजीचालकांना किलो मागे 86 रुपये मोजावे लागणार आहे. गेल्या महिन्याभरात सीएनजीच्या दरात सतत वाढ होत आहे. काल मध्यरात्रीपासूनच नवे दर लागू करण्यात आले आहे. याआधी नाशिक मध्ये सीएनजीचे दर 80 रुपये किलो होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies