Video पाहून तुम्हालाही वाटेल कौतुक,कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी तयार केली मानवी साखळीसोशल मीडियावर लोकांच्या शौर्याशी संबंधित अनेक व्हिडीओ आहेत. काही व्हिडीओ तर लाखो वेळा पाहिले गेले आहेत. स्वतःच्या जीवावर खेळून इतरांचा जीव वाचवणाऱ्या अशा धाडसी लोकांचे कौतुक करताना इंटरनेट वापरकर्ते कधीही थकत नाहीत. असाच एक व्हिडीओ काही दिवसांपासून इंटरनेटवर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ कझाकिस्तानमधील अल्माटी शहरातील आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारा माणूस जीवाची पर्वा न करता कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी एका कालव्यात उतरतो. त्याचवेळी आजूबाजूचे लोक त्याचे शौर्य पाहून त्याच्या पाठीशी उभे राहतात आणि त्याला मदत करण्यासाठी मानवी साखळी तयार करतात.

व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये एक कुत्रा कालव्यात अडकल्याचे दिसत आहे. कालवा अतिशय वेगाने वाहत आहे. कालव्याच्या मधोमध कुत्रा कुठून अडकला हे कळत नाही. कालव्यात कुत्रा अडकलेला पाहून कसलाही विचार न करता एक व्यक्ती आपला जीव पणाला लावून कुत्र्यासाठी पाण्यात उतरतो. कालव्याच्या मोठ्या भिंतीवरून घसरून तो पाण्यात येतो. ती व्यक्ती पाण्यात सावधपणे पुढे जाते आणि कुत्र्याजवळ पोहोचते. कसा तरी तो कुत्र्याला कालव्यातून बाजूला घेऊन येतो. परंतु, आता तिरक्या उंच भिंतीवरून कुत्र्याला कसे न्यायचे? हा प्रश्न त्याच्या समोर उभा राहतो.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured