Type Here to Get Search Results !

आटपाडी : मेंढपाळ मारहाण प्रकरणी तीन आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल



आटपाडी : आटपाडी तालुक्यातील देशमुखवाडी येथे मेंढपाळाला झालेल्या मारहाणी प्रकरणी आटपाडी पोलिसात तीन आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, शेमणेवाडी ता. चिक्कोडी, जि. बेळगाव येथील मेंढपाळ मनगेनी मल्लप्पा गावडे हे मेंढ्या घेवून चरण्यासाठी आटपाडी तालुक्यातील देशमुखवाडी येथे आले होते.


ते मेंढराचा कळप घेवून पाणी पाजण्याकरीता घेवून जात असताना आरोपी शिवाजी देशमुख, प्रवीण देशमुख, दीपक काटकर सर्व रा. देशमुखवाडी यांनी आमच्या शेतात मेंढरे का सोडली असे म्हणत मनगेनी मल्लप्पा गावडे यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळी केली. तसेच टॉवेल मध्ये दगड गुंडाळून डोक्यात जबर मारहाण केली आहे.


याबाबत आटपाडी पोलिसात आरोपी विरुद्ध भा.दं.वि. स. कलम ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल केले असून सदर घटनेचे अधिक तपास पोहेकॉ गावडे करीत आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies