Type Here to Get Search Results !

कोरोनाचा आलेख वाढताच! दुसऱ्या दिवशी हजारांपार बाधित



मुंबई : गेल्या काही दिवासांपासून कोरोना  बाधितांची संख्या कमी झाल्याने सुटकेचा श्वास सोडणाऱ्या राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात पुन्हा एकदा नव्या कोरोना बाधित होणाऱ्यांची संख्या झापाट्याने वाढत असून,  दुसऱ्या दिवशी राज्यात नव्या वाधित होणाऱ्यांच्या संख्येने हजारांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासात राज्यात 1045 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 517 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 


 कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत एकूण 77,36,792 जण कोरोनामुक्त झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.07 टक्क्यांवर नोंदवण्यात आले आहे. तर, मृत्यूदर 1.87 टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात कोरोनाच 4,559 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील कोरोनाचे सर्वाधिक 3,324 रूग्ण मुंबईत आहेत. या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये जाणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. सध्या कोरोनाबाधित वाढत असून ही काळजीची बाब असल्याचे त्यांनी म्हणत, वाढत्या रूग्णसंख्येवर राज्य सरकारचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies