Type Here to Get Search Results !

‘हा’ दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार; राज्य सरकारचा निर्णय



मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर झाला होता. यामुळे राज्यात सोमवारी ‘शिवस्वराज्य दिन’  साजरा करण्यात येणार आहे. सोमवारी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्यास अभिवादन करतील.


६ जून म्हणजे शिवराज्यभिषेक दिन  या दिनालाच राज्य सरकारने ‘शिवस्वराज्य दिन’ असे नाव दिले आहे. शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन. या दिवशी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येईल. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. 


राज्यात ६ जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांना सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies