Type Here to Get Search Results !

या मार्ग वरील अपघातात कार झाली पलटी


पुणे:  सातारा रस्त्यावर शिंदेवाडी  येथे ट्रकने मोटारगाडीला धडक देऊन झालेल्या अपघातात मोटारगाडी दुभाजकाला धडकून पलटी झाली. सुदैवाने मोटारगाडीच्या एअर बॅग्ज उघडल्याने मोटारगाडीतील कोणालाही दुखापत झाली नाही.


रस्त्यावर शिंदेवाडी पोलिस चौकीच्या समोर रविवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. मोटारगाडी आणि ट्रक पुण्याच्या दिशेने निघाले होते. यावेळी ट्रकच्या पाठीमागच्या बाजूचा धक्का मोटारगाडीला लागला. त्यामुळे मोटारगाडी रस्त्यामधील दुभाजकाला धडकून रस्त्यावर उलटली. या अपघातात मोटारगाडीच्या एअर बॅग्ज उघडल्या. त्यामुळे मोटारगाडीतील कोणालाही दुखापत झाली नाही. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies