Type Here to Get Search Results !

बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचे 1 लाख रुपये चोरण्याच्या प्लनमध्ये अडकली महिला



बुलडाणा : मेहेकर येथील स्टेट बँकेत शेतकरी पैसे काढण्याकरिता गेला होता. तेव्हा त्या शेतकऱ्याच्या पाठीशी एक महिला उभी राहिली व हातचलाखीने शेतकऱ्याच्या हातातील कापडी पिशवी ब्लेडच्या मदतीने कापली व पिशवीतील एक लाख रुपये चोरले. जेव्हा शेतकऱ्याच्या लक्षात आले तेव्हा त्याने त्या महिलेले हटकले व तिची तपासाणी करायला लागला.


 तिने पटकन हातातील पैसे खाली जमिनीवर टाकून दिले. मी घेतलेच नाही असे सांगू लागली. शेतकऱ्याने ते पैसे उचलले व तब्यात घेतले. त्यामुळे शेतक-याला स्वतःचे एक लाख रुपये मिळाले. या घटनेनंतर संबंधित शेतक-याने पोलिसांत धाव घेतली.


 पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार प्रियंका प्रदीप सिसोदीया (रा.कडिया, ता.पाचौर, जि.राजगड, राज्य मध्यप्रदेश), तसेच मिनाक्षी कुंदन सिसोदीया, मनिषा राका सिसोदीया (रा. कडिया, ता.पाचौर, जि. राजगड, राज्य मध्यप्रदेश) या तीन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही महिलांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी नमूद केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies