Type Here to Get Search Results !

122 पैकी 25 जागा ओबीसींसाठी आरक्षित:सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश!मुंबई:  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये नागरिकांच्या ओबीसी प्रभाग आरक्षण सोडत नवी मुंबई मनपामार्फत जाहीर करण्यात आली. शाळकरी विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. महानगरपालिकेची यावेळची निवडणूक एकूण 122 जागांसाठी होणार आहे. यामध्ये ओबीसीसाठी 25 जागा आरक्षित करण्यात आल्या असून यातील 13 महिला तर 12 पुरुष ओबीसी असणार आहेत. ही निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होणार असल्याने पडलेल्या आरक्षणाचा फटका कुणालाही बसलेला नाही. पुरुष किंवा महिला यापैकी कुणीही असलेल्या नगरसेवकांच्या घरातील एक प्रतिनिधीला निवडणूक लढता येणार आहे.नवी मुंबईतील लोकसंख्या वाढल्याने यंदाच्या निवडणुकीत 11 जागा नगरसेवकांच्या वाढल्या आहेत. शहरात ऐरोली आणि बेलापूर असे दोन विधानसभा आहेत. विधानसभेतील नगरसेवक संख्येची तुलना केल्यास केल्यास यावेळी वाढलेली नगरसेवक संख्या ऐरोली विधानसभा मतदारसंघात जास्त आहेत.एकूण 122 नगरसेवकांपैकी 13 नगरसेवकांच्या जागा अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यातील महिलांना एकूण 61 ठिकाणी आरक्षणानुसार संधी मिळणार आहे. महिलांना पन्नास टक्क्यांपेक्षा कमी जागा आरक्षित करु नये असे निर्देश असल्याने निवडणुका पार पडल्यावर महिला राज दिसणार आहे. अनेक प्रभागात श्रीमान श्रीमती जोडीने मनपा मध्ये निवडून येण्याची शक्यता आहे. नवी मुंबई मनपाच्या निवडणुका प्रथमच बहुसदस्य पद्धतीने होत आहेत. एकूण 41 प्रभाग असून यात 40 प्रभाग त्रिसदस्यीय तर एक प्रभागात द्विसदस्यीय पद्धतीने असणार आहे. एकूण प्रभागातील लोकसंख्येच्या तुलनेत 20.59 टक्के जागा नागरिकांच्या मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवल्या आहेत. यासाठी आता नागरिकांच्या सूचना आणि हरकती दाखल केल्यावर याबाबत अंतिम निर्णय निवडणूक आयोगामार्फत घेतला जाणार आहे. मंगळवारी हरकती सूचना मांडण्याचा अखेरचा दोन दिवस आहे. सर्वसाधारण महिला खुल्या प्रवर्गात 20 प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले. या आरक्षण सोडतीकडे मोजके नेते वगळता सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री शिंदे गटाचे देखील मोजके पदाधिकारी या सोडतीला हजर होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या सोडतीकडे पाठ फिरवली. या सोडतीच्या अंतिम प्रक्रियेनंतर येत्या दोन महिन्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नव्या आरक्षण सोडतीनुसार 84 जागा आरक्षित 

आता नव्या आरक्षण सोडत काढल्यानंतर 11 जागा अनुसूचित जाती, 2 जागा अनुसूचित जमाती आणि 25 जागा ओबीसी अशा एकूण 84 जागा आरक्षित झाल्या आहेत. यामध्ये महिला एकूण 61 जागांवर निवडणूक लढवणार असून अनुसूचित जातीसाठी सहा महिला, 1 जागा अनुसूचित जमाती तर 13 जागा ओबीसी महिलांना आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. 41 जागा सर्वसाधारण जागेवर महिला लढवू शकणार आहेत. येत्या निवडणुकीत 61 महिला आणि 61 पुरुष नगरसेवकांचे वर्चस्व असणार आहे.(सौ.abp माझा)Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies