Type Here to Get Search Results !

15 वर्षीय मुलाचे 35 वर्षीय महिलेवर जडले प्रेम; मुलाला घरी बोलावले अन...!


जमुई : बिहारच्या जमुईमध्ये एका अकरावीत शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलाचे 35 वर्षीय महिलेवर प्रेम झाले. त्यानंतर  तो सदरील महिलेला भेटायला तिच्या घरी देखील गेला. मात्र त्यानंतर जे घडले त्याची कुणी कल्पनाही केली नसेल. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  बिहारमधील जहानाबाद येथे राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलाची जमुई येथील 35 वर्षीय महिलेसोबत फेसबुकवरून ओळख झाली. हाय हॅलो म्हणत दोघांमध्ये चांगल्या गप्पा रंगल्या. त्यानंतर मैत्रीही झाली. कालांतराने या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर सदरील अल्पवयीन मुलगा त्याच्या 35 वर्षीय प्रेयसीला भेटण्यासाठी जेहानाबादहून जमुईला गेला. तिथे पोहचल्यानंतर महिलेने त्याला घरी बोलावून घेतले. आपला माहेरचा पाहुणा आहे असे सांगत तिने आपल्या पतीसह सासरच्या मंडळींचा विश्वासही जिंकला. त्यानंतर पती कामावर गेला असताना महिलेने आपल्या 15 वर्षीय प्रियकरासोबत शारीरिक संबध ठेवण्यास सुरूवात केली. पण एकेदिवशी महिलेचा पती कामावरून लवकर घरी पोहचला. त्यावेळी त्याने आपल्या पत्नीला 15 वर्षीय मुलासोबत नको त्या अवस्थेत बघितले. या सर्व प्रकारानंतर महिलेच्या पतीने दोघांनाही बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.


दरम्यान, पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांना जमुई येथे बोलावून घेतले. त्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी जमुई गाठले आणि ते मुलाला जहानाबादला घेऊन गेले. तसेच,  पोलिसांनी महिलेच्या पतीची देखील समजूत काढली. याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies