Type Here to Get Search Results !

देशाला आज मिळणार नवे राष्ट्रपती; 15 वा राष्ट्रपती “कोण” असणार?



नवी दिल्ली : आज देशाला 15 वे राष्ट्रपती मिळणार आहेत. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाल्यानंतर आज गुरुवारी 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संसद भवनात मतमोजणी सुरू होणार आहे. त्यामुळे देशाचा 15 वा राष्ट्रपती कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.



राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून द्रौपदी मुर्मू आणि संयुक्त पुरोगामी आघाडीकडून यशवंत सिन्हा निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत होणार असल्याने आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.


दरम्यान, निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी, राज्यसभेचे महासचिव पी.सी. मोदी गुरुवारी मतमोजणीवर लक्ष ठेवणार असून, सायंकाळपर्यंत निवडणूक निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. पी.सी. मोदी आधी सर्व खासदारांच्या मतांची मोजणी करणार आहे त्यानंतर निवडणुकीच्या ट्रेंडची माहिती देतील आणि त्यानंतर 10 राज्यांची मते मोजल्यानंतर पुन्हा माहिती शेअर करतील. तसेच, अनेक राज्यांत मुर्मूच्या बाजूने 'क्रॉस व्होटिंग' झाल्याच्या बातम्याही आल्या. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सदस्यांना व्हिप जारी केला जात नाही.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies