Type Here to Get Search Results !

आज शिंदे सरकारचा कोर्टात 'सर्वोच्च' निर्णय ; 16 बंडखोर आमदारांची आमदारकी जाणार ?मुंबई:  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 बंडखोर आमदारांची आमदारकी जाणार की राहणार याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज महाराष्ट्रातील सत्तांतराबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीबाबत अनिश्चितता असल्याचे शक्यता व्यक्त केली जात आहे.  सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी शिवसेनेचे वकील आज कोर्टात विनंती करणार असल्याची माहिती  समोर येत आहे. या सुनावणीवर शिंदे सरकारचे भवितव्य अवलंबून असणार आहे.  एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, महेश शिंदे , चिमणआबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर, रमेश बोरणारे  या आमदारांच्या मानेवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.दरम्यान,  आज या प्रकरणी सुनावणी झाली आणि जर या 16 आमदारांना अपात्र ठरवले सध्या सरकारला कोणताही धोका नाही. शिंदे सरकारकडे सध्या 164 इतके बहुमत असून त्यापैकी 16 आमदार जरी अपात्र ठरले तरी ही संख्या 148 इतकी होईल. विधानसभेतील बहुमत हे 144 इतके आहे. 
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies