किल्ल्यावर गेल्यावर आली चक्कर ; 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू!नाशिक - पर्यटनासाठी दिंडाेरी तालुक्यातील रामशेज किल्ल्यावर गेलेल्या 20 वर्षीय तरुणाचा चक्कर येऊन मृत्यू झाला. हा तरुण सिडकोतील शिवपुरी चौकात वास्तव्यास होता. अजय सरोवर मृत तरुणाचे नाव आहे.याबद्दल अधिक माहिती अशी कि, पावसाळी पर्यटनाचा हंगाम असल्याने आणि शनिवारची सुटीमुळे सिडकोतील शिवपुरी चौकात राहणारे सरोवर कुटुंब शहराच्याजवळ असलेल्या रामशेज किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते.यादरम्यान  किल्ल्यावर गेलेल्या अजयला  चक्कर आल्यावर त्यास त्याच्या काही मित्र आणि नातेवाईकांनी त्याला उचलून खाली आणले व त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान,  अजयचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अजय हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured