सांगली: दारुची पार्टी करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून मिरज तालुक्याच्या गुंडेवाडीतील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बंद पडलेल्या डी एम के टोयोटा इमारतीवर ही घटना घडली आहे. अक्षय कुमार माने (वय 21) असे तरुणाचे नाव असून तो कैकडे गल्ली गुंडेवाडी येथे राहत होता.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मध्यरात्रीच्या सुमारास तांनग फाटा येथे बंद पडलेल्या डी एम के टोयोटा शोरुमच्या इमारतीमध्ये ही घटना घडली आहे. या ठिकाणी नेमलेल्या सुरक्षारक्षकाने आणि त्याच्या मित्रांने या बंद पडलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पार्टी केली होती. सुरक्षारक्षकसोबत अक्षय माने आणि गुंडेवाडी येथील आणखी दोघे मित्र असे चौघे या पार्टीचा आस्वाद घेत होते. दारुच्या नशेत खाली उतरताना अक्षय हा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला.
दरम्यान, सनी माने याने मयत अवस्थेत अक्षय माने याला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर त्वरित पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकणी मिरज ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.