Type Here to Get Search Results !

देशात चौथी लाट येणार? ; गेल्या 24 तासांत कोरोनाचे ‘इतके’ नवे रुग्ण!



नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.  तसेच आता  रुग्णसंख्येने  20 हजारांचा टप्पा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 20 हजार 139 नवे रुग्ण आढळून आले असून 38 जणांचा मृत्युही झाला आहे.



बुधवारी देशात 16 हजार 906 रुग्णांची नोंद आणि 45 रुग्णांचा मृत्यू झाला होता. बुधवारच्या तुलनेत देशातील मृत्यूंची संख्या घटली असली तरी, कोरोना रुग्णांच्या संख्येत 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांची ही नवीन आकडेवारी जारी केली आहे. दरम्यान, नवीन आढळून आलेल्या रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 43, 689,989 वर पोहचली आहे.



आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 482 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी दिवसभरात 38 जणांचा मृत्यू झाला. यासह कोरोनामुळे एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 5 लाख 25 हजार 557 वर पोहोचली आहे.सध्या भारतात कोरोनाचे 1 लाख 36 हजार 76 सक्रिय रुग्ण आहेत.


दरम्यान,  देशात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहे. बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 2 हजार 575 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies