Type Here to Get Search Results !

घरात घुसून 28 वर्षीय तरुणाचा केला खून!



बीड - काल रात्री साडेसातच्या दरम्यान, गेवराई शहरात 28 वर्षीय तरुणाचा, घरात घुसून तिघांनी मारहाण करत खून केला आहे. बाबू शिवराम शिनोरे वय 28 रा. संजय नगर गेवराई असे खून करण्यात आलेल्या मयत तरुणाचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  मयत बाबू शिनोरे हा रात्री साडेसातच्या दरम्यान राहत्या घरी असताना, जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघांनी घरात घुसून त्याला मारहाण केली. स्थानिक नागरिकांनी यावेळी गंभीर अवस्थेत असलेल्या बाबू सिनोरे याला, पोलिसांनी तात्काळ गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालय दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.


दरम्यान, याप्रकरणी गेवराई पोलिसांकडून गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies