Type Here to Get Search Results !

कर्जबाजारीपणाला कंटाळून 38 वर्षीय विवाहित तरुणाची आत्महत्या!



बीड : बीडच्या राजेगावमध्ये कर्जबाजारीपणा आणि आर्थिक नैराश्यातून एका 38 वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुग्रीव देवीदास जाधव (वय 38) रा. राजेगाव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  मयत सुग्रीव जाधव यांनी आपल्या स्वतःच्या राहत्या घरात, एका रॉडला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 



दरम्यान, घटनेची माहिती कळताच केज पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची आकस्मात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयत सुग्रीव जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक 14 वर्षाची मुलगी व दुसरा 12 वर्षाचा मुलगा, असा परिवार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies