Type Here to Get Search Results !

पुरात वाहून गेलेल्या 45 वर्षीय व्यक्तीचा चार दिवसानंतर सापडला मृतदेह!



धुळे : साक्री तालुक्यात झालेल्‍या मुसळधार पावसात नदी, नाल्‍यांना पुर आला होता. यात घोडदे गावातील युवक वाहून गेला होता. दरम्‍यान चार दिवसापासून वाहून गेलेल्‍या युवकाचा मृतदेह आज सापडला. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  साक्री तालुक्यात गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे परिसरात जलमय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यादरम्यान सर्वच नदी नाले हे तुडुंब भरून वाहत असताना घोडदे गावातील मासे पकडण्यासाठी गेलेला 45 वर्षीय इसम नदीला अचानक आलेल्या पुरात वाहून गेला होता.  आता चार दिवसानंतर या इसमाचा मृतदेह पुराचा जोर कमी झाल्यानंतर घोडदे पुलाखाली आढळून आला आहे. दादाजी शिवबत पगारे (वय ४५) असे या व्यक्तीचे  नाव आहे.



दरम्यान, संबंधित इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies