Type Here to Get Search Results !

7 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

 जुलै महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचे वेगळे असे महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जुलै महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचे महत्त्व नेमके काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 7 जुलैचे दिनविशेष.


1854 : 7 जुलै 1854 साली कावसजी दावर यांनी मुंबईत कापड गिरणी सुरू केली. 


1896 : ऑगस्त आणि लुई या ल्युमिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चलचित्राची निर्मिती केली. 7 जुलै 1896 साली मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये खास स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. 


1910 : 7 जुलै 1910 रोजी पुण्यात भारत इतिहास मंडळाची स्थापना झाली. वि. का. राजवाडे आणि खं. चिं. मेहंदळे यांनी या संस्थेची स्थापना केली. मराठेशाहीच्या इतिहासाचे संशोधन करणारी ही भारतातील एक अग्रगण्य स्वायत्त संस्था आहे.

 

1981 : महेंद्र सिंग धोनीचा जन्मदिन

महेंद्र सिंग धोनीचा जन्म 7 जुलै 1981 रोजी राजपूत परिवारात झाला. 'माही' आणि 'एम.एस. धोनी' या नावाने तो ओळखला जातो. त्या सोबतच तो 'कॅप्टन कूल' म्हणूनही धोनीला ओळखले जाते. त्याने 2007 पासून 2016 पर्यंत मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये आणि 2008 पासून 2014 पर्यंत कसोटी फॉर्मेटमध्ये भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून काम केले आहे. त्याने 2007 च्या आयसीसी विश्वचषक टी -20, 2010 आणि 2016 आशिया कप, 2011 आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि 2013 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनी हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 


1973 : कैलास खेर यांचा जन्मदिन

कैलास खेर यांचा जन्म 7 जुलै 1973 साली उत्तरप्रदेशमध्ये झाला. कैलास खेर हे भारतीय गायक, गीतकार आणि दिग्दर्शक आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे. 


1999 : कॅप्टन विक्रम बात्रा यांचे निधन 

कॅप्टन विक्रम बात्रा हे भारतीय सैन्याचे अधिकारी होते. 7 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धात ते शहीद झाले. त्यांना परमवीर चक्र हा शौर्य पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला आहे. 


7 जुलै : जागतिक चॉकलेट दिन

दरवर्षी 7 जुलै हा दिवस जागतिक चॉकलेट दिन म्हणून साजरा केला जातो. 1550 मध्ये 7 जुलै रोजी युरोपमध्ये पहिल्यांदा चॉकलेट दिवस साजरा करण्यात आ ला. यानंतर संपूर्ण जगभरात हा दिवसा साजरा होऊ लागला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies