Type Here to Get Search Results !

कच्चे तेल 9 डॉलर्सनी स्वस्त; पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्येही घट?



नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 24 तासांत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती तब्बल 9 डॉलर्सनी घटल्याची माहिती समोर येत आहे.  


 

भारतीय तेल कंपन्यांनी मंगळवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आज देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशातील पेट्रोल -डिझेलचे दर स्थिर आहेत. 



तसेच,  आता महाराष्ट्रात सत्तापालट झाला आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना पेट्रोल-डिझेलच्या दरांत कपात करणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. 



सध्या देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीतही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. राजधानी असलेल्या दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 102.63 रुपये तर, डिझेलचा दर 94.24, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रतिलिटर आहे. 



त्यानंतर  आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.88 रुपये तर डिझेलचा दर 95.37 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.74 रुपये तर डिझेलचा दर 96.20 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.08 रुपये तर डिझेलचा दर 95.59 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.34 रुपये तर डिझेलचा दर 95.84 रुपये प्रति लिटर आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies